चित्र रेखाटिता हरित पावलांनी
नाव ही रेखिले मृदेच्या कणांनी
उच्छवासापरी धुराडे चुलीचे
ओकते काजळी भरोनी ढगांनी
आरसा पाहुनी नटावे सजावे
स्वप्न डोळ्यातले गुलाबी क्षणांनी
गंध मातीतला मिळाला हवेला
शिंपिता अंगणी सडा या घनांनी
लागले भृंगहे इथे ते घुमाया
काव्य शाकारता कळ्यांनी फुलांनी
वृत्त – गा ल गा, गा ल गा, ल गा गा, ल गा गा.