In this Ghazal(32 matras) the poetess says, ‘I shall carefully preserve one soft petal of your heart in my heart. I shall listen beats of rhythm and become ‘Raadhaa(राधा)’. (Raadh means our soul).
जपून ठेविन हृदयी माझ्या तव हृदयाची मृदू पाकळी
ताल लयीचा ऐकत राहिन होउन राधा निळीसावळी
संकेतांचे शुभ्र धुके हे तरल गुलाबी झाले आहे
जोडत आहे अपुली नाती मुला-फुलांची एक साखळी
माती पाणी समीर अग्नी प्रेमळ छाया आभाळाची
रिक्त जाहल्या मम देहाची भरते पुन्हा मुग्ध रोवळी
घडेल आता सारे सुंदर सत्य शिवासम हसेल अंबर
नयनी दोन्ही ज्योत तेवते मनात का पण खुळीबावळी
हेवेदावे अहं सोडुनी ठिणगीमधला जीव फुलवुनी
दाव ‘सुनेत्रा’ साऱ्या जगता जात प्रीतिची मस्त वेगळी