प्रियच आहे, अजुन मला मी, जरी जाहल्या, कैक चुका
अचुक दाबे, गुप्त कळा मी, जरी जाहल्या, कैक चुका
स्वरुपसुंदर, फूल कन्यका, पुत्र गुंड मम, पुरुषार्थी
सतत गाता, खुला गळा मी, जरी जाहल्या, कैक चुका
सलिल वाहे, मम काव्याचे, प्रेम वाटण्या, हर्षभरे
सत्य आहे, नव्हे बला मी, जरी जाहल्या, कैक चुका
गिरव गझला, मुक्त कराने, अर्थ भाव युत, शेरांच्या
पुसत राहिन, स्वच्छ फळा मी, जरी जाहल्या, कैक चुका
नील अंबर, शुभ्र चांदणे, कैवल्याची, झलक जणू
सुमन भारित, शेत मळा मी, जरी जाहल्या, कैक चुका
मात्रावृत्त(७+८+८+६=२९ मात्रा)