This ghazal is written in akshargan vrutta. Vrutta is GAA LA GAA GAA, GAA LA GAA GAA, GAA LA GAA GAA, GAA LA GAA GAA. In this Ghazal, kafiyaas are goodha, hooda, moodha, booda etc. (savatee kaafiyaa ghazal).
जाणण्या आतूर आहे नेणिवेतिल गूढ कोणी
अर्थ स्वप्नांचे बिलोरी लावतो मग हूड कोणी
सागरी लाटेस अडवुन बेरकी भूखंड लाटे
बांधतो घरकूल त्यावर गांजलेला मूढ कोणी
मोडकी खुर्ची जरी ती पकडण्या धावून येतो
ठोकुनी मोळ्या-खिळ्यांना टेकवीतो बूड कोणी
सोयरे लुटतात म्हणुनी फेकण्या डोळ्यात त्यांच्या
कांडुनी मिरच्या उन्हाळी बनविली ही पूड कोणी
दाटला अंधार पण हा आंधळा वेगात चाले
डोळसांना वाट दावी धरुन हाती चूड कोणी
वृत्त- गा ल गा गा,गा ल गा गा, गा ल गा गा, गा ल गा गा.