पर्व दशलक्षण दिगंबर जैनियांचे थोरले मी
त्याचसाठी भावनेतिल अर्थ सुंदर खोरले मी
साधका आत्माच साधन शुद्ध निर्मल जाणल्यावर
मम मनाच्या आगमातिल शब्द दडले चोरले मी
भूक्षमा अन मार्दवादी धर्म दाही पाळणाऱ्या
भूतकालिन मुनिवरांचे शिल्प दगडी कोरले मी
भक्तिपूर्वक अष्टद्रव्ये अर्पिल्यावर जिनप्रभूला
शांतता मजला मिळाली झोपल्यावर घोरले मी
ज्ञान श्रद्धा शील सम्यक तीन शेरांची गझल ही
मिरविण्या कंठात हृदयी गाठवीले डोरले मी