This Ghazal is writeen in matravrutta. It contains sixteen matras. In this the poetess says, how she feels uneasy when she don’t write anything. She says after she wrote anything she feels uneasy again. Tagmag is Radif of this Ghazal. Mhanun, Firun, banun etc are kafiyas.
लिहिले नहीं म्हणून तगमग
लिहून झाले फिरून तगमग
उगाळते मी चंदन जरी हे
गंध दाटतो बनून तगमग
जरी गोठते जरी तापते
तरी न जाते जळून तगमग
धुके दाटले दोघांमध्ये
करी साजरे हसून तगमग
अश्रू सिंचन अश्रू इंधन
भडकत जाई अजून तगमग
घे भूमी तू कुशीत मजला
जाईलका मग मिटून तगमग
जा शब्दांनो छळू नका मज
प्राशिन प्याला भरून तगमग
शून्य पोकळी शून्य सुनेत्रा
उसळे लाव्हा फुटून तगमग