तव साधना ‘सुनेत्रा’ लय सूर ताल यांची – TAV SADHANA ‘SUNETRA’ LAY SUR TAL YANCHI


In this ghazal, the poetess feels that everyone except her, is behaving in wiser way. But she doesn’t bother about it. She likes this ‘wise’ madness. From the point of view of wise people, the artists, poets, writers are mad people. This madness is called diwanapan.

सारे इथे दिवाणे नाही कुणी शहाणे
मी एकटीच वेडी यांचेच हे बहाणे

फुलतात शब्द ओठी जाई जशी फुलावी
जुळवून अक्षरांना गातात ते तराणे

जागून मी भरावे कणसात चांदण्यांना
मोडून जोंधळ्याला टिपतात हेच दाणे

स्वप्नात राहुनी मी जगण्यात रंग भरते
यांना न भावतेरे माझे इथे रहाणे

शोषून वाढले हे माझेच रक्तपाणी
हे सोडणार केव्हा पाण्यात मज पहाणे

तव साधना ‘सुनेत्रा’ लय सूर ताल यांची
बाजार मांडुनी हे गाती रिमिक्स गाणे

वृत्त- गा गा ल गा, ल गा गा, गा गा ल गा, ल गा गा.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.