हवा पावसाळी उदास उदास
तरी कुसुम उधळे सुवास सुवास
जिथे रम्य संध्या पहाट दुपार
निशा मस्त तेथे झकास झकास
जसा धावणारा जळात तरंग
तसा भावनेचा प्रवास प्रवास
उडाया झुलाया खुले घरदार
तिथे पाखरांचा निवास निवास
म्हणे कोण तृष्णा तहान तयास
किरण चुंबणाऱ्या दवास दवास
लढे जो कराया स्वतःस स्वतंत्र
करे कैद कैसा खगास खगास
वृत्त – ल गा गा , ल गा गा, ल गा ल, ल गा ल.