तापता गोठता अंबरी पीर हे
मेघमालेतुनी बरसले नीर हे
वारियाने उडे पल्लवी तीक्ष्ण ही
माधवी वल्लरी उधळिते तीर हे
हारणे ना अता ध्यास हा लागता
जिंकण्या त्यागिती मीपणा वीर हे
पूर्ण तो चंद्रमा हासता विहरता
सांडते भूवरी चांदणी क्षीर हे
रक्षिण्या मायभू बांधवा आपुल्या
सोडुनी शत्रुता ठाकले मीर हे
चूक मम व्हावया खूप घाई नडे
शांत मग राहिले सांधण्या चीर हे
लढविती गझलगड संयमी होउनी
मर्द हे मावळे शूर हे धीर हे
स्त्रग्विणी (अक्षरगणवॄत्त)
लगावलीः गालगा गालगा गालगा गालगा
मात्राः २१२ २१२ २१२ २१२ = २०