बावरीकी बावळी ही माझिया जाळ्यात रे
माजलेली काष्ठ काठी माझिया जाळ्यात रे
दाविते मजला हुशारी समजते मज काय ती?
काव्य कच्चे चाखणारी माझिया जाळ्यात रे
मूर्ख भोंदू माणसांना नाचवे तालावरी
नाटकी ती अर्धवेडी माझिया जाळ्यात रे
जो अहं कुरवाळते ती तो अहं जाळी तिला
धामिणीसम वीषधारी माझिया जाळ्यात रे
मी पणा हा ना अहंपण हा ‘सुनेत्रा’ चांदवा
चांदव्याला ग्रासणारी माझिया जाळ्यात रे
लगावली – गालगागा/ गालगागा/ गालगागा/ गालगा/
मात्रा – २६