This Ghazal is written in 16 matras. Radif of this ghazal is kaisee(कैसी) and kafiyas are jagale, tarale, zukale etc.
तुझ्याविना रे जगले कैसी
या पाण्यावर तरले कैसी
ताठ जरी मी सदा राहिले
प्रेमामध्ये झुकले कैसी
थोडे असुनी जपलेले क्षण
फुलताना गडबडले कैसी
कधी न केली प्रीत कुणावर
वदले अन गहिवरले कैसी
बर्फ असूनी तप्त झळांनी
तुझ्यातुनी ना गळले कैसी
जपून श्रद्धा मैत्री नाती
माणूसघाणी ठरले कैसी
नाव ‘सुनेत्रा’ असूनसुद्धा
जगताना धडपडले कैसी