चिमण-पाखरा – CHIMAN-PAKHARA


This Ghazal is written in 32(thirty two) matras. Radif of this Ghazal is ‘Zadakhali.’  ‘Zadakhali’ means under a tree.
In the second sher of this Ghazal it is said that, on the earth, the wind, the water, doesn’t belong to a single person. It belongs to all living beings. We should be happy within what we have.

थांब जरा तू चिमण पाखरा या चाफ्याच्या झाडाखाली
विशाल घरटे जरी तुझे रे आकाशाच्या झाडाखाली

हे पाणी अन हा वारा ना कुण्या एकट्यासाठी वाहे
भामेपरि मग उदास का तू प्राजक्ताच्या झाडाखाली

प्राशुन घे तू गंध फुलांचे मुग्ध निरागस हसणे त्यांचे
मातीसम मग गंधवती तू या प्रेमाच्या झाडाखाली

तुझ्या पाकळ्या दिसती लोभस स्पर्श एकदा करू काय रे
माझ्यासाठी फुलशील का तू मम काव्याच्या झाडाखाली

तुझे हासणे रुसणे फुगणे कैद करोनी नजरेमध्ये
झुलत रहावे हिंदोळ्यावर तव स्वप्नांच्या झाडाखाली


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.