This Ghazal is written in ten(10) matras. In this Ghazal dot given on some letters is not anusvar(अनुस्वार); it is for giving lay(लय) to that letter.
दळण दळणं सरलं गं
घुमत जगणं सरलं गं
अवचित सुटलं ग्रहण
कुढत बसणं सरलं गं
धुणं बडवणं सुकवणं
वरण हटणं सरलं गं
चुकणं बिकणं असतंच
पण बिचकणं सरलंगं
हरणं कमळं मृगजळ
जळणं फसणं सरलं गं
जलद फिरव करवत
सरण रचणं सरलं गं
रमण करतं खटखट
पण भिववणं सरलं गं
नटणं सजणं हवंहवं
गुपित बघणं सरलं गं
सृजन नमन करतंय
चरण धरणं सरलं गं
जगणं हसत खळखळ
मरण बघणं सरलं गं
भरलं सुटलं गलबत
भरणं झरणं सरलं गं
वृत्त- ल ल ल ,ल ल ल , ल ल ल ल.