धगधगत्या अग्नीत तावुनी – DHAGDHAGTYAA AGNEET TAAVUNEE


धगधगत्या अग्नीत तावुनी, शुध्द जाहले!
असत्यास मी, ठार मारण्या, सिध्द जाहले!

वसुंधरेवर, जीवन फुलण्या, प्रपात असुनी;
धबाबणारा!  शृंखलेत मी, बध्द जाहले!

सुरभित शीतल, लहर असोनी, बघुन भडाग्नी;
हपापलेला! क्षणभर चंचल, क्रुध्द जाहले!

कणखर असुनी, बंध अनामिक, तोडण्यास मी;
कर्म जाळले! कातरवेळी विध्द जाहले!

सांजवात लावून अंतरी, बघत राहिले…
समाधीत मम, रमण्यासाठी, बुध्द जाहले!

मात्रावृत्त (१६+८ = २४ मात्रा)


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.