This Ghazal is written in sixteen(16) matras. Radif of this Ghazal is ‘kunalaa’ and kafiyas are gaay, saay, maay, paay, jaay etc.
नकोस देऊ गाय कुणाला
नात्यावरची साय कुणाला
करती पोरे अता वाटण्या
बाप कुणाला माय कुणाला
म्हणे अताशा देव वाटतो
कुणास कुबड्या पाय कुणाला
तवा तापला भाजा पोळ्या
श्रेय कुणाचे जाय कुणाला
जिंक रणी वा मार मला तू
नको म्हणू पण टाय कुणाला
नेत्र सुखाने भरून येता
हृदय म्हणाले हाय कुणाला
भरून वाहे ओंजळ माझी
म्हणू कसे मी बाय कुणाला