This Ghazal is written fourteen matras. Radif of this Ghazal is Sakhya and Kafiyas are Chaha, Paha, Saha, Vaha, Raha, Naha.
नको अवेळी चहा सख्या
वेळ जरा तू पहा सख्या
नाते अपुले नको असे
तीनावर जणु सहा सख्या
या जगण्याची लज्जत घे
वाफ होउनी वहा सख्या
मी प्याला की नीर मधुर
माझ्यातच तू रहा सख्या
वाळ्याचे मी सरबत रे
गंधामध्ये नहा सख्या