नको काक मारू नको जीव मारू
किनाऱ्यास तारू नको जीव मारू
करे पोट पूजा लुटोनी दुकाने
जरी तो लुटारू नको जीव मारू
उन्हाने जळाली कुणाची पिके अन
म्हणे तूस वारू नको जीव मारू
तुला सावल्यांचा निवारा मिळाला
जलाला फवारू नको जीव मारू
तुला आवडे जर पहाया फुलांचा
व्हिडीओ शिमारू नको जीव मारू
लगावली – लगागा/लगागा/लगागा/लगागा/