This Ghazal is written in fifteen(15) matras.
In this Ghazal the poetess says, If you become open minded you will be able to solve biggest problems in your life.
उघड झरोके, कवाड दार!
सहज सागरा, करशिल पार!
दो नयनांची, पाहुन धार!
हृदय जाहले, पुरते गार!
क्षणाक्षणाला, नवी शिकार!
तीर म्हणूकी, तुज तलवार!
का थरथरतो, माझा श्वास?
गझल असावी, त्यावर स्वार!
येशिल का तू, स्वप्नी आज?
उडे पापणी, वारंवार!
गंध काफिया, रदीफ वाण;
अशा फुलांचा, गुंफू हार!
झेलायाला, पुनश्च वार;
गझल ‘सुनेत्रा’ तुझी तयार