In this Ghazal the poetess says, ‘Always there are mute songs of love on my lips. All the time I see you from windows of my eyes’. This Ghazal is written in akshargan vrutt.Vrutt is LA GAA LA, GAA GAA, GAA LA, LA GAA GAA.
सदैव ओठी, मुग्ध तराणे;
सताड खिडकी, नित्य पहाणे.
दवात हलते, शीतल काया;
नयन कुणाचे, बिंब दिवाणे.
नकोच घाई, थांब जरा रे;
सतार म्हणते, वाजव गाणे.
खळाळतेहे, नीर मजेने;
खट्याळ वारे त्यात पुराणे.
नकोच टुमणे, माप कशाला?
पुरे अता ही, स्वैर प्रमाणे.
भुईनळ्यांचे, लाव फटाके;
प्रकाश पसरे, नाद दणाणे.
असेल, आहे, होय म्हणावे;
तीच ‘सुनेत्रा’ तेच बहाणे.
वृत्त- ल गा ल, गा गा, गा ल, ल गा गा.