क्षमाशील संसद व्हावी जसे नामदेव
क्षमाशील साधू जैनी तसे नामदेव
संयमास धारण करुनी जिंकले कषाय
क्षमाशील धरणी यक्षी असे नामदेव
ठाकठोक केली निष्ठुर मूर्त बसवण्यास
क्षमाशील कायेमध्ये वसे नामदेव
शिव्याशाप त्यांचे त्यांना पावुदेत लक्ष
क्षमाशील ओठी माझ्या बसे नामदेव
संत मूळ धर्मी पावन दिगंबर नामी
क्षमाशील नेत्री माझ्या ठसे नामदेव
गझल मात्रावृत्त (मात्रा २३)