तरुणाईचा पहिला थांबा वय चवदा की सोळागं
बाराचा की दहा ग्रामचा खरा कोणता तोळागं
तारेवरती अधांतरी तू चालतेस बघ तोऱ्यातं
पुरे ताणणे तुटेन आता प्राण जाहला गोळागं
कटिवर घागर घेउन जेंव्हा पाय टाकिशी पाण्यातं
मस्त झुळझुळे रेशिम-हिरवा नऊवारिचा घोळागं
किती खिळखिळे करशिल मजला चूक चुकचुके वेडातं
नाव शोभते कुठलेही तिज खिळा चुका स्क्रू मोळागं
नको कटूता देना गोडी या पुरणाच्या पोळीसं
सण कुठलाही असो लाडके गौरी शिमगा पोळागं
मात्रावृत्त(८+८+८+५=२९ मात्रा)