पहिला पाऊस पहिलं प्रेम,
प्रेम कसलं फसवा गेम. .
किती ताणलं धनुष्य तरी,
कवी बाळाचा चुकतो नेम…
“पहिला पाऊस पहिलं प्रेम”
कुणीतरी कवी म्हणतो. .
पावसावरती कविता रचत….
कल्पनेतच प्रेम करतो!
कवी कल्पना सुंदर असतात ;
ह्रुदयमधलं झुंबर असतात !!
वारा येतो झुळूक येते . .
झुंबर किणकिण गाणे गाते ….
कवी वेडा वेडाच असतो,
कवयित्री वेडी नसते !
सुंदर सुंदर शब्दांची….
ती एक पेढी असते !!!