पाठवण – PAATHAVAN (FAREWELL)


लिहावयाला मजला पुरते एक आठवण
आठवणींची नकोच गर्दी नको साठवण

स्मरणांचे मी मणी ओवुनी माळ बनवली
गळलेल्यांची करित आहे पुन्हा पाठवण

जखमांमध्ये हळद भरूनी जखमा भरल्या
मलम सुगंधी मला न रुचले जखमा सुकल्या

मधुर मधुर मी शब्दांवरती नव्हते भुलले
मधुराभक्ती शुद्धात्म्यावर जडवुन बसले

जरी हरवले पुन्हा गवसले माझे मजला
वळणावरती वळता वळता सापडले मजला


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.