आत्मघाती संस्कृतीचा कळस खोटा छान तू
सुंदरांच्या प्रकृतीचा पाय सोटा छान तू
संधिसाधू बेरकी ते अक्षरांना बदलती
मस्त त्यांना ठोक द्याया दगड गोटा छान तू
मंदिरे ते बांधताती फायदा लाटावया
संत बनुनी कमव आता पुण्य तोटा छान तू
मोडण्या लग्ने तयांचा कुंडलीचा फार्स हा
गूण मग जुळवीत बसती मोज नोटा छान तू
हाच मोठा मीच मोठी वाद मी नच घालते
मोक्ष मिळण्या मम जिवाला मार्ग छोटा छान तू
नीर प्याया पात्र गझला तव ‘सुनेत्रा’ देखण्या
दुध निरसे प्यावयाला स्वच्छ लोटा छान तू
वृत्त – गा ल गा गा, गा ल गा गा, गा ल गा गा, गा ला गा.