पाहते का अशी मज गझल रोखुनी
चूक शोधू नको वृत्त हे स्त्रग्विणी
तीक्ष्ण दृष्टी मला लाभता तव कृपे
काफिये मी असे निवडते चाळुनी
मोकळे ढाकळे बोलुया भांडुया
हेच मी सांगते संयमी राहुनी
गुंफिते शब्द मी शुभ्र हे शारदे
चरण तव स्पर्शिते लीन मी होउनी
ज्ञानधारा खिरे सूक्ष्म छिद्रातुनी
चिंब मज व्हायचे या जली न्हाउनी
स्त्रग्विणी (अक्षरगणवॄत्त)
लगावलीः गालगा गालगा गालगा गालगा
मात्राः २१२ २१२ २१२ २१२ = २०