This Ghazal is written in Aksharganvrutt. Vrutt is LA GAA, LA GAA GAA, LA GAA, LA GAA GAA.
In this Ghazal the poetess says, Don’t be unhappy with life. Live happily in present and remember only sweet memories of happy past.
जरा रुसावे पुन्हा खुलावे
मधुर क्षणांना जुन्या स्मरावे
सुखद असे जे जिवास माझ्या
गुपीत सुंदर मला कळावे
सुचतिल मजला वसंत गाणी
म्हणून मीही फुलून यावे
खट्याळ वारा भरारणारा
वनातला मी तडाग व्हावे
कशी ‘सुनेत्रा’ असेल आहे
खरे नि खोटे मलाच ठावे
वृत्त -ल गा, ल गा गा, ल गा, ल गा गा