पुन्हा तू कोकिळे – PUNHA TU KOKILE


In the last stanza of this ghazal the following message is given: if you want to do bright work, then don’t be afraid to fight with darkness.
vrutta- LA GAA GAA, GAA LA GAA GAA, GAA LA GAA, GAA GAA LA GAA.

पुन्हा तू कोकिळे ती, बासरी होऊ नको;
वसंती वारियाने, नाचरी होऊ नको.

कसे शोधू तुला मी, वादळी वाऱ्यात या;
भिजवुनी शब्द माझे, शायरी होऊ नको.

किनारा वाळवंटी मी, मला तू प्राशण्या;
सुनामी लाट वेडी, सागरी होऊ नको.

कधी का शृंखलांनी, बांधिले वाऱ्यास या;
नको रे प्रेमिका तू कातरी होऊ नको.

विजेचा लोळ प्यावा, वाटते जेव्हा तुला;
तमाशी झुंजताना, बावरी होऊ नको.

वृत्त – ल गा गा, गा ल गा गा, गा ल गा, गा गा ला गा.

प्रेमिका तू


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.