This is a Bhaktigeet written in the form of Ghazal. It is written in Ghazal form so it has Radif and Kafiyas. Radif is ‘Visarun jave sare kshanbhar’ and kafiyas are Tekun, Malun, Prashun, Vahun, Fekun, Todun.
प्रभुचरणाशी माथा टेकुन विसरुन जावे सारे क्षणभर
करुणामय दवतुषार माळुन विसरुन जावे सारे क्षणभर
भावभक्तिचा भरून प्याला अधरापाशी कुणी आणिला
तवगुणरसमय अमृत प्राशुन विसरुन जावे सारे क्षणभर
तुझी पापणी मुळी न लवते अश्रुंनी मम ओंजळ भरते
त्या पुष्पांची माला वाहुन विसरुन जावे सारे क्षणभर
मिटुन शिंपले अर्धे अधुरे कसे जाणशी चराचरारे
तुजसम होण्या कषाय फेकुन विसरुन जावे सारे क्षणभर
मी नच सीता चंदनबाला मी तर वेडी मूढ सुनेत्रा
तरिही वाटे जोखड तोडुन विसरुन जावे सारे क्षणभर