Ghazalkaar Ilahi Jamadar has written many many Ghazals.
‘Manaas maazyaa pise jadaave asech kaahee tuzyaat aahe'(मनास माझ्या पिसे जडावे असेच काही तुझ्यात आहे), this Ghazal is one of the beautiful ghazal in his ghazals.
The Ghazal ‘Praan’ is written on the same base. Radif of this ghazal is, असेच काही तुझ्यात आहे, same as llahi’s ghazal.
वेड होउनी तुझे मरावे असेच काही तुझ्यात आहे
प्राण होउनी तुझा जगावे असेच काही तुझ्यात आहे
लिहिता लिहिता तुज पकडावे असेच काही तुझ्यात आहे
तुझ्याचसाठी खास लिहावे असेच काही तुझ्यात आहे
तुला रडवुनी मीच रडावे असेच काही तुझ्यात आहे
चिंब चिंब मी तुज भिजवावे असेच काही तुझ्यात आहे
काट्याने तुज गोंजारावे असेच काही तुझ्यात आहे
गुलाब जरि मी तुज टोचावे असेच काही तुझ्यात आहे
शिल्प प्रीतिचे मी घडवावे असेच काही तुझ्यात आहे
मम काव्याने ते फुलवावे असेच काही तुझ्यात आहे
निर्झर दुहिता वा डोहाचा काठ सागरी तुझा स्पर्शिण्या
लाट होउनी मी उधळावे असेच काही तुझ्यात आहे
बाग फुलविण्या तव स्वप्नांची अणु रेणू परमाणू सम मी
मातीमध्ये मिसळुन जावे असेच काही तुझ्यात आहे
झळकत सळसळ कोसळणारी वीज व्हावया त्या नेत्रीची
तव नजरेला मी चुम्बावे असेच काही तुझ्यात आहे
लसूण मिरची लवंग ओवा जिऱ्या-मिऱ्याला वरवंट्याने
तव डोईवर मी वाटावे असेच काही तुझ्यात आहे
चूल पेटवुन तवा ठेउनी निगोदवासी जीव सुटाया
लाह्यांसम मी तुज भाजावे असेच काही तुझ्यात आहे
तुज छळणाऱ्या पाली झुरळे उंदिर माश्या पळवायाला
जाडजूड मी झाडू व्हावे असेच काही तुझ्यात आहे
रामबाण मी जरी दवा रे जहर काढण्या तव रक्तातिल
डासांसम मी तुज चावावे असेच काही तुझ्यात आहे
जपण्यासाठी हृदये नाजुक तव हृदयाचे कवच जाहले
मागशिल ते तुला मिळावे असेच काही तुझ्यात आहे
वीज खेळते माझ्याआडुन लपंडाव बघ तुज फसवाया
तेव्हा धो धो मी बरसावे असेच काही तुझ्यात आहे
संगणकावर हिशेब करुनी वाचवशिल तू वेळ जरी रे
त्या वेळेला मी भागावे असेच काही तुझ्यात आहे
कमेंट करुनी तव स्टेटसवर हळुच डोकवुन तव हृदयी मी
फेसबुकावर प्रेम करावे असेच काही तुझ्यात आहे
कुलूप दगडी मौन कलंदर हातोड्याने का फोडावे
काव्य कळीने मी उघडावे असेच काही तुझ्यात आहे
मूर्तिमंत सौंदर्य जरी तू जांभुळलेल्या तुझ्या कुंडलिस
उदबत्तीवर मी जाळावे असेच काही तुझ्यात आहे
माझ्यासाठी सारे माझे अवयव गोळा होता कानी
तव हृदयाने गाणे गावे असेच काही तुझ्यात आहे
तुझ्या निरागस नेत्रांमध्ये रूप आपुले बघण्यासाठी
देवांनीही तुला स्मरावे असेच काही तुझ्यात आहे
खळाळणाऱ्या तुझ्या मनातिल निसर्ग हसरा पाहुन कोणी
स्वतः हसावे अन हसवावे असेच काही तुझ्यात आहे
सौंदर्याला तुझ्या मापण्या अजून कोणी कसे न आले
तुला पाहुनी प्रश्न पडावे असेच काही तुझ्यात आहे
हृदय सरोवर भरुन वाहण्या सुनेत्र होउन बरसत वर्षत
मोक्षालाही मी त्यागावे असेच काही तुझ्यात आहे