In this Ghazal the poetess says, God lives in our heart. Our daily duties are the karma we perform. Therefore, we should do our duties honestly. This ghazal is written in ‘aksharganvrutt’. The vrutt is GAA GAA LA GAA, LA GAA GAA, GAA GAA LA GAA, LA GAA GAA.
Here, the radif is aahe and kafiyaas are dharm, karm, narm, charm, marm, varm.
गझलेत सांगते मी प्रेमात धर्म आहे
सोडू नकोस कामे धर्मात कर्म आहे
अपवाद ठेव नियमी काही मृदू फुलांचे
तब्येत त्या फुलांची नाजूक नर्म आहे
लेखू नको कमी तू कार्यास कातडीच्या
जपण्यास प्राणज्योती देहास चर्म आहे
मी मी किती करावे याचा हिशेब नसतो
तू गाळ ‘मी’ पणाला आत्म्यात मर्म आहे
सृष्टीत दोन जाती आई नि बाप असती
माणूस वर्गवादी गंडात वर्म आहे