गझल माझी मधुर बाला वाचते बाराखडी
वाचताना बरसते बघ चांदण्यांची फुलझडी
चंद्र सुंदर अंबरीचा रंगलेला या क्षणी
मुग्ध त्याचे रूप कोमल टिपुन घेते ही घडी
तारकांचा खेळ चाले पकडण्या उल्केस या
सापडेना ती तयांना खेळती मग त्या रडी
ही न उल्का ही कळीरे आत्मगंधी दंगली
फेकण्या जाळे तिच्यावर राज्य घेई नवगडी
राज्य घेतो ध्रुव जेव्हां पकडण्या कलिका गुणी
तो म्हणे तिज पकडण्याची काय इतुकी तातडी
वृत्त – गा ल गा गा, गा ल गा गा, गा ल गा गा, गा ल गा.