फुलाफुलांची फुलवायल – FULAA FULAANCHEE FULVAAYAL


In this Ghazal(32 matras) the poetess says, I want to wear a new saree of soft cotten having prints of flowers.
This Ghazal is written in thirty-two(32) matras. In this Ghazal Radif is absent. So this Ghazal is known as Gairmurradaf ghazal. Kafiyas are fulvaayaa, sajvaayaa, baghaayaa, radaayaa, karaayaa, pahaayaa, ujalaayaa etc.

फुलाफुलांची फुलवायल मी नेशिन म्हणते मन फुलवाया
सुगंध कोरा हवाहवासा प्राशिन म्हणते तन सजवाया

जाई जुई अन मस्त मोगरा मिळेल आता तिथे बघाया
कारण तुम्ही नकाच शोधू खोटे खोटे उगी रडाया

अश्रू नाही खारे पाणी ते तर तुमच्या  रडगाण्याचे
भरून ठेवा मिठागरातुन अळणी भोजन बरे कराया

प्रीती म्हणजे नव्हे मोगरा गुलाब तो तर काट्यामधला
गाली नाही नेत्री फुलतो हृदय घेउनी याच पहाया

तुझी आसवे इतुकी निर्मल वाहुन नेती मीपण अवघे
शिंपल्यात ती पडतिल कारे होउन मोती मज उजळाया

पुरुष नव्हे मी प्रकृति आहे स्वाभाविक ते मला आवडे
नार्सिससचा वसा सोडुनी येशील का तू इथे रहाया

क्षणात धरती क्षणात अंबर पिसे लागले तुला ‘सुनेत्रा’
उतरुन तुझिया डोळ्यामध्ये कसे लागले पहा वहाया


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.