In this Ghazal there are six shers. Here radif is Aataa(now) and kafiyas are, raangolee, paakolee, kadbolee, khaandolee, chaarolee, aangholee, baarolee.
Here in maktaa(last sher) the poetess suggests us to call this ghazal as baarolee.
घाल अंगणी, बकुळ फुलांची, रांगोळी आता;
सुगंध लुटण्या, गरूड होई, पाकोळी आता…
पनीर घुगऱ्या, मस्त जिलेबी, मजेदार मेनू;
पोळीसंगे, ताट सजविते, कडबोळी आता…
कर्पुर ज्योती शुद्ध तुपाची, धूप तुम्हा देते;
जाळा कर्मे, नका करू रे, खांडोळी आता…
मुक्तक म्हणते, ऐक रुबाई, नको गाल फुगवू;
चार ओळिची, बनेल सुंदर, चारोळी आता…
मंत्र भारले, उदक शिंपडुन, वैद्य बने भोंदू;
गंडे दोरे, जाळुन करुया, आंघोळी आता…
ऐक सुनेत्रा, गुपीत यांचे, कान मला सांगे;
सहा शेरयुत, गझलेला म्हण, बारोळी आता