लेक दाल मी
पुफ्फ लाल मी
धवल पीत घन
नेक बाल मी
तव लगावली
गाल गाल मी
गडद काजळी
तीट काल मी
लेखणीतली
तरल चाल मी
जाळ वर्गणा
आग झाल मी
काय ऐकशी
बाण ढाल मी
पकड एक लय
सूर ताल मी
जांब शाल्मली
वृक्ष साल मी
तलम ओढणी
हरित शाल मी
कळस तांबडा
उजळ भाल मी
पान आपटा
तबक थाल मी
स्थूल देह ना
सूक्ष्म जाल मी
उडद हरभरा
मूग वाल मी
कांच बाटली
नव पखाल मी
डांबण्यास तुज
जेल डाल मी
मीठ भाकरी
सत्य माल मी
पंच परमपद
जिन महाल मी
उत्तरातला
मम सवाल मी
जल विहंग मन
पाप क्षाल मी
चित्रकारिता
बेमिसाल मी
कुशल शेर युत
पद कराल मी
भरुन ओतते
धन कमाल मी
पाच इंद्रिये
दम त्रिताल मी