जवळपास वा दूरदूरवर ओळख सुकली भिजते आहे
हिरवा श्यामल फिकट पारवा श्रावण घन मनी दाटत आहे
निळसर राखी सडकेवरुनी भिजली वर्दळ वहात आहे
वर्दळीस मी भरून डोळी घनास मनीच्या शिंपीत आहे
किलबिल चिवचिव ऐकायाला वाऱ्यासंगे हलता झाडे
पत्र्यांवरती टपटप उतरत पाऊस तेव्हा म्हणतो पाढे
असेच केव्हातरी आवडे जगावयाला पावसासही
पाढे म्हणता म्हणता गातो माझ्यासंगे मजेत तोही