मणका माझा कणां पाठिचा नागिण कट्टर अनल जणू
मस्तक माझे फडा दहाचा कृष्ण मेघना सजल जणू
या मणक्याला लोंबकळूनी कैक जणांनी दगा दिला
कुरकुरतो पण अजुन टिकोनी विश्वासाठी नवल जणू
मणक्यावरती गझल उभी ही राज्य कराया जगावरी
शिडीवरूनी कळस पूजन्या आतुरलेले कमल जणू
अगीनगाडी मणक्यावरुनी आयटीत जाते ऐटीत ग
धूर न ओके इंजिन पुष्पक विमान भूवर धवल जणू
सांजभयाच्या जंजाळातुन सुटका करण्या अंधांची
चंद्र ‘सुनेत्रा’ क्षितिजावरती धुके लपेटुन तरल जणू
गझल – मात्रावृत्त (मात्रा ३०)