मी कविता अन मी कवयित्री प्रतिभा मम आई
विषय न कुठला वर्ज्य असे मज मी ठाई ठाई
नकाच घालू मज अंगावर प्रासांचे दागिने
पुरे जाहली सक्ती ऐश्या वृत्तातच उडणे
नकाच शोधू माझ्यामध्ये जड जड प्रवृत्ती
स्वच्छंदी मी चंडोलासम निर्भर मम वृत्ती
चैतन्याला उडव उडवण्या मनभावन सृष्टी
गाज अंतरी गर्जायाला प्रेमाची वृष्टी
लिहिता लिहिता उसळत नाचत निर्झर ये वरती
कशास म्हणता अशा अवेळी घे घे निवृत्ती