मागून मिळाले नाही देऊन मिळाले मजला – MAGUN MILALE NAHI DEUN MILALE MAJALA


In this ghazal(28) matras) the poetess says, When I demanded for something then   I don’t get it. But when I tried my best to give someone that I have already, then I got all these things(love, happiness, healthy and wealthy life, respect) again and again. This Ghazal is Gairmurraddaf Ghazal. Kafiyas are Majala, Didhala, Bharala etc.

मागून मिळाले नाही देऊन मिळाले मजला
ओतून रिक्त हा प्याला पण पुन्हा कशाने भरला

पाण्यात बुडाले पुरती वाहून तरीना गेले
त्या स्वच्छ जलाने मजला आधार फुलांचा दिधला

मोकाट सर्प हे फिरती वारूळ तयांचे पडले
मज भीति वाटली म्हणुनी मी कोष भोवती विणला

हातात गुंफुनी हाता विस्मृती स्मृतींच्या संगे
जगण्यास अर्थ मम देते अन वळण लाविते मजला

बदनाम फुलांना करुनी रक्तात बुडविले त्यांनी
कळणार कुणाला केव्हा हा रंग प्रीतिचा धवला

शोधीत कुणाला फिरले हरवून स्वत:ला बसले
ही व्यर्थ सुनेत्रा घाई वाटेत कुणी मज वदला


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.