हवेसारखो अवतीभवती सदैव माझ्या असतेस तू…
दूर कुठे इथेच घरभर रंग उधळित असतेस तू…
मुक्तछंद झऱ्यासारखी खळाळत वाहत रहा …
तुझा आनंद जाशील तिथे मुक्त मुक्त उधळत राहा ..
… माझे मुली सांग तुला काय देऊ… माझ्याकडून … आज भेट…
तूच दिलास तुझ्या रुपात.. अनमोल ठेवा भेट…
तुझा जन्म तुझा आहे .. तुझ्यासाठी जगत रहा …
तेव्हाच जगशील आमच्यासाठी… असेच गात राहण्यासाठी…
मधुर मधुर पक्षी गातात …झाडं पुन्हा हिरवी होतात…
रोज पहाटे निसर्गाला गाण्यातूनच … साद घालतात…
अशीच साद घालशील जेव्हा भरून भरून वाहताना…
डोळ्यात माझ्या बिंब बनून पाहशील जेव्हा स्वतःला ..
येशील तेव्हाच धावत धावत…
सहज मला भेटायला… सहज मला भेटायला…