माय माझी अता रे कुठे राहते
कोण सांगेल मज नव तिचे नाव ते
स्वप्न मी पाहते झोपता जागता
बालिका होउनी गोड ती हासते
नाचते खेळते ती परी होउनी
अंगडे टोपडे घालुनी झोपते
तिजसवे बोलण्या गीत मी लिहितसे
मायबापा तिच्या पत्र मी धाडते
म्हणतसे कोण मज ही पुरी नाटके
नाटकी माणसे मी अशी टाळते
Ghazal in aksharganvrutt
Lagavali- GAA LA GAA GAA, LA GAA GAA, LA GAA GAA, LA GAA.