जुनाट विहिरीवरती जाइन शिकार करण्या माशांची
नेम धरोनी गळास फेकिन शिकार करण्या माशांची
पाऊसगाणी म्हणेन मी ग धारांमध्ये भिजेन मी
पावसातही अविरत गाइन शिकार करण्या माशांची
काटेरी सोनेरी मासे झुळकन सुळकन फिरताना
आवडीचे त्यां तुकडे टाकिन शिकार करण्या माशांची
जळात लहरी लहरीवर फिर माझ्या मोठ्या माश्या तू
तुझ्यामागुती तव मासोळिन शिकार करण्या माशांची
पकडिन मासे तऱ्हेतऱ्हेचे कंदिल घेउन रात्रीही
जलदेवीला मीन च वाहिन शिकार करण्या माशांची
रचेन गझला अक्षरवृत्ती मात्रांमध्ये ओघवत्या
मत्स्यपरीला झुलवत ठेविन शिकार करण्या माशांची
पुन्हा सुनेत्रा ताठ जाहली उचलाया जाळं जडशीळ
कोळीणीसम निपूण होइन शिकार करण्या माशांची
मात्रावृत्त – १६+१४=३० मात्रा