मीपण तूपण, उकळत गेले, मी तू मी तू, म्हणता म्हणता…
अधरांवरती, गरळ साठले, छी थू छी थू, म्हणता म्हणता…
अर्क सुगंधी, कडवट कोको, चहा पातिचा, दुधाळ कॉफी
पेय कपातिल, उडून गेले, पी तू पी तू, म्हणता म्हणता…
प्रेम प्रियेचे, कधिन जाणले, फक्त बोचरे शब्द ऐकले
हयात सारी, संपुन गेली, ती तू ती तू म्हणता म्हणता…
भीति घालुनी, मलाच माझी, उगाच लज्जित, कंपित झाले
गूढ भयाला, जाळित गेले, भी तू भी तू म्हणता म्हणता…
बिया आधिकी, झाडे आधी, या वादाचे, टोक गाठले
शुद्ध गोमटे, बीजच बनले, बी तू बी तू म्हणता म्हणता …
मात्रावृत्त (८+८+८+८ =३२ मात्रा)