मी कर्म निर्जरा केली – MEE KARM-NIRJARAA KELEE


This Ghazal is written in akshargan vrutt. Here radif is ‘mee prem n tujavar kele(मी प्रेम न तुजवर केले) and kafiyaas are bhaang, saang, taang etc. This Ghazal is written in 27 maatraas.

डोळ्यांस पाजुनी भांग, मी प्रेम न तुजवर केले
पाण्यात पाहुनी सांग, मी प्रेम न तुजवर केले

पोळ्या न भाजल्या लष्करी, सोडून कामधंदा
कामास देउनी टांग, मी प्रेम न तुजवर केले

घडवून वेगळी वाट, नेटाने चालत गेले
मोडून नेटकी रांग, मी प्रेम न तुजवर केले

धोंड्यास फोडुनी सूक्ष्म, मी कर्म निर्जरा केली
गर्वात फेडण्या पांग, मी प्रेम न तुजवर केले

कोणास वाटले ढोंग, हा दोष न मम प्रीतीचा
देण्यास बेगडी बांग मी प्रेम न तुजवर केले

उखडून उंबरा दार, साच्यात कसे मज बसवू
करण्यास देह विकलांग, मी प्रेम न तुजवर केले

चंडोल होउनी जाय, गर्वात ‘सुनेत्रा’ स्वर्गी
पाहून वेळ पंचांग मी प्रेम न तुजवर केले

(वृत्त- गा गा ल, गा ल गा गा ल, गा गा गा, गा गा गा गा , एकूण मात्रा २७)


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.