मी जलधारा – MEE JAL-DHAARAA


This Ghazal written in twenty-seven(27) maatraas. Here radif is ‘De malaa(दे मला)’ and kafiyaas are jaag, bhaag, baag, tyaag, raag, daag, aag, maag.

अन्य न काही, नकोच आता, फक्त जाग दे मला;
कशास आता, गोळाबेरिज, पूर्ण भाग दे मला.

मुग्ध फुलांना, सुगंध देण्या, रंगविले मी मना;
फुलण्यासाठी, अंगण आणखी, एक बाग दे मला.

पुरे मिळविणे आणि काढणे, गुणाकार ही नको;
भागुन भागुन, दमल्यानंतर, सरळ त्याग  दे मला.

अनुरागाने, जिंकित गेले, एक एक मोहरा;
शिकेन गाणे, मम आत्म्याचे, सर्व राग दे मला.

छुमछुमणारे, सुवर्णपैंजण, मोत्यांची जोडवी;
बकुळफुलांचे, वस्त्र सुवासिक, नवे डाग दे मला.

मी जलधारा, चंदनगंधित, जरी फुलविते मळा;
भस्म कराया, गाजर-गवता, तप्त आग दे मला

भेटशील तू, खरेच मजला, साद तुझी ऐकते;
तुझ्याचसाठी, वसन बनविते, हातमाग दे मला.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.