मुखड्यावरुनी मनुष्य कळणे सोपे नसते
कळल्यावर पण ते समजवणे अवघड असते
पूस माणसा ऐना अपुला बिंब पाहण्या
ना पुसला तर अवघड सारे होवुन बसते
विनाशकाले विपरित बुद्धी झाल्यावरती
मोहाच्या जाळ्यात माणसा युक्ती फसते
ना प्राण्यांना ना झाडांना मीपण बीपण
फक्त माणसा अहंपणाची नागिण डसते
मुखडे बिखडे विकार विसरुन हात जोडता
शुद्धात्म्याचे रूप मनोहर हृदयी ठसते