‘Mukhavate’ means masks used for hiding the face.In this Ghazal the poetess says , Around me here and there I see men and women, wearing masks. But I have faith in my eyes. My eyes recognize those eyes which have good vision.
कैक मुखवटे वावरती पण मी डोळ्यांना ओळखते
तरंगणारी फुले त्यातली अन काट्यांना ओळखते
रंग वेगळे पोत वेगळे आकाराने भिन्न जरी
वल्हवणारे हात तुझे अन हर होड्यांना ओळखते
प्रिय मला काटेरी कोंदण कधीच नाही मज रूतले
माझ्यासाठी बनले भाले त्या काट्यांना ओळखते
तीर होऊनी टिपेन तुम्हा छळाल जरका पुष्पांना
माणसातल्या हिंस्त्र रानटी मी प्राण्यांना ओळखते
उषा शिंपते सडा ‘सुनेत्रा’ माणिक-मोती पाचूंचा
मावळतोना चंद्रही जेथे त्या वाड्यांना ओळखते