कोणाला मैत्रीत हसायचं असतं…
कोणाला काही सांगायचं असतं ….
कोणाला काही पहायचं असतं…
कोणाला काही ऐकायचं असतं…
कोणाला कधीतरी रडायचंही असतं ….
कोणाला तर काहीही करायचंच नसतं ….
पण तरीसुद्धा ….
मैत्रीच्या समूहात टिकायचं असतं ….
वेगळे वेगळे असलो तरी ….
वेगळेपणाला खूप खूप जपत…
सगळ्यांसोबत रहायचं असतं….
सगळ्यांचंच सगळं सारखं नसतं ….
बरंच काही वेगळंही असतं….
तरीपण …
बरंच बरंच सारखंही असतं …
म्हणूनच केव्हातरी का होईना पण…
दुसऱ्याचं वेगळेपणही शोधायचं असतं…
त्याला जाणून घ्यायचं असतं….
एकामेकांना जाणत जाणत…
मैत्रीचं फूल जगवायचं असतं ….