रंगलेल्या नभी सूर्य नारायणा
अर्घ्य देण्या तुला ताठ माझा कणा
पेल हाती ध्वजा लाव कळसावरी
शुद्ध आहे तुझी भावना धारणा
साठलेले जळी प्रेम गंधाळले
उघड आता खऱ्या अंतरीच्या खणा
सर्प मित्रांसवे केतकीच्या बनी
नाग चिंतामणी डोलवीती फणा
वाहिले तू पुरे काव्य हृदयातले
उपट डोक्यातल्या माजलेल्या तणा
पुस्तके वाचुनी लेक झाली गुणी
लोकगीते तिची रेशमी झोळणा
ही ‘सुनेत्रा’ स्मरे काव्यदेवी तुला
ग्रंथपूजा करे गाउनी पाळणा
Ghazal in aksharganvrutt
Lagavali- GAA LA GAA GAA, LA GAA GAA, LA GAA GAA, LA GAA.