वारा म्हणे ढगाला जा तू धरेवरी
भिजवून तप्त माती गा तू धरेवरी
मरुतास सलिल सांगे येइन तुजसवेच
बिजलीसवे पडोनी पातू धरेवरी
उतणार जलद काळे सांडणार धो धो
खेळून मृत्तीकेत मातू धरेवरी
आता नकोस नाचू वेगात ये घना
लावावयास रे अन सा तू धरेवरी
होताच सांज येती गाई घराकडे
रंगात गोधूलीच्या न्हा तू धरेवरी
गझल मात्रावृत्त – मात्रा २२ (१२ + १०)