This Ghazal is written in akshargan vrutta.
Vrutta is LA GAA GAA, LA GAA GAA, LA GAA GAA, LA GAA GAA.
Here in matalaa Ghazal is personified as a small girl.
मधुर मस्त लाजे गझल लाजमोडी
जरी माय टाळे तिच्या कैक खोडी
तिचे हट्ट माफक जरी पुरविले मी
तिला देत आहे अता आम्रफोडी
चिखल ऊन थंडीत मार्गात काटे
म्हणूनी खडावा हवी शालजोडी
जसा अर्थ सुंदर तसा ताल ठेका
खरे काव्य जपतो असा राग तोडी
उजळ ध्येय माझे तुझे लक्ष्य निर्मल
फुला घे भरूनी श्वासात गोडी
किती वेग वाढे हिचा सहज म्हणुनी
वळण खास देते मराठीस मोडी
मुक्याने सुनेत्रा इथे शेर गर्जे
तरे आज डौलात तिथे पुष्पहोडी
वृत्त – ल गा गा, ल गा गा, ल गा गा, ल गा गा.